तुकोबांचे अभंग:

महामारीच्या संकटात मनोधैर्य आणि आत्मिक शांतीचा अमृत अनुभव

तुकोबांचे अभंग आजच्या कठीण काळात आपल्याला धैर्य, शांती, आणि सुख प्राप्त करण्याचा मार्ग दाखवतात, जीवनातील अडथळ्यांवर मात करण्यासाठी एक प्रेरणादायक आणि अमूल्य स्रोत आहेत.

मार्गदर्शन

  • तुकोबांचे अभंग मनुष्यास मानसिक बळ देतात आणि त्यांचे वाचन आणि श्रवण घडल्यास तर मनास सहजच शांती आणि धैर्य प्रदान होते.
  • असे हे अभंग खचलेल्या मनाला केवळ धीरच देत नाहीत तर त्याद्वारे त्यांच्या आत्मविश्वासात देखील भर घालून आत्मिक शांती आणि समाधान देखील प्राप्त करून देतात.
  • एवढेच नव्हे तर कासावीस झालेल्या जीवाची व्याकुळता कमी करून जीवाला खरे सुख व खरे समाधान ह्यांच्याशी ओळख करून देऊन ते पुढे प्राप्त देखील करून देतात.
  • तसेच मनी देवाप्रति खरा भक्तिभाव व श्रद्धा कशी निपजेल व मृत्यूची भीती कशी चेपेल यावर देखील लक्ष केंद्रित करून अखेरीस त्यावर विजय मिळवून मनुष्यास भेवरहीत आयुष्य प्रदान करवून देतात.
  • असे हे तुकोबांचे अमृतासमान असलेले अभंग मानुष्याच्या जीवनातील दोष जाळून त्यात पुण्याची भर घालतात आणि वर त्याच्या आध्यात्मिक उद्धारासाठी लाखमोलाचे मार्गदर्शन देखील करतात.
  • आम्हाला तुमची माहिती प्रदान करून तुम्ही आमच्या सेवा अटी आणि गोपनीयता धोरणानुसार तुमची माहिती संग्रहित करण्यास आणि वापरण्यास संमती देत ​​आहात.

माझ्याविषयी थोडक्यात:

अभिप्रेत

एकनाथ वाघ (Eknath Wagh)

आपण फक्त प्रश्नाचे उत्तर नाही, तर त्यातील मर्म अंत्यत मेहनतीने समजून सांगितले. वाचकांना समाधान मिळेल यात तर शंका नाही, पण तुम्ही जी मेहनत घेतली त्याचे आपणाला टिपण्या मधून आत्मिक समाधान मिळेल.

माझ्यासाठी अध्यामतील सर्वोत्कृष्ट उत्तर आहे. धन्यवाद. आपण माझ्या "पौराणीक कथा - तत्वज्ञान" या मंचामध्ये योगदानाकर्ते म्हणून आमंत्रित करीत आहे, त्याचा स्वीकार करा.


निवृत्त वायुसैनिक आणि वस्तु सेवा कर अधिकारी

मनोज इंगुले (Manoj Ingule)

काय सांगावे, तुमचे निरूपण वाचता वाचता डोळ्यात पाणी तरळले.

संतांची थोरवी काय वर्णावी, ह्या मातीची, कुलस्वामिनीची कृपाआणि आईवडिलांची पुण्याई कि इथे जन्म घेऊन थोडा फार तरी ह्या भक्ती रसात न्हायलो.

काही खुप चांगली अध्यात्मिक माणसे भेटली.

आणि असलीच तर पूर्वजन्माची कमाई, संचित. हे म्हणायचे कारण म्हणजे

पूर्व सुकृताची जोडी ।
म्हणोनि विठ्ठल आवडी ।।

तुम्ही असेच लिहिते रहा. कारण ह्या अपव्होट साठी आसुसलेल्या कोरावर असे काही निखळ हाती लागले कि अत्यानंद होतो.

अनुभव चित्ता, चित्त जाणे।



Akshay Ambekar

हे बघा… मी एक अती सामान्य वैज्ञानिक दृष्टी बाळगणारा माणूस आहे.. मला माहित नाही ज्ञानेश्वरांनी जे केलं ते अफवा आहेत की खर आहे.. मी विश्वास पण नाही ठेऊ शकत आणि नाकारू ही नाही शकत. पण आपण अस बोलत आहात की जणू तुम्ही हे सगळ अनुभव केलंय… आजच्या वैज्ञानिक दृष्ट्या तरी हे काही शक्य नाही याचा अर्थ हे नाही की हे अशक्य आहे… मी विज्ञानाचा अभ्यासक आहे आणि मला हे चांगलंच माहीत आहे की विज्ञान हे सातत्याने बदलत राहत आणि ही अतिशय सुंदर गोष्ट आहे… धार्मिक गोष्टींमधे जे लीहले आहे ते सर्वमान्य आहे त्यापलीकडे काही ज्ञानच नाही अस आहे, ब्रम्हांड आपल्या धर्मात पहिलच सांगितलं आहे….पण हे तितकं सोप नाही… ब्रम्हांड खूप मोठं आहे कोणीच त्याला पूर्णपणे समजू शकला नाही आहे.. बाकी हे संत वगैरे नक्की काय करतात काय माहीत… एवढं अविश्वसनीय ब्रम्हांड असताना ते का कुठल्यातरी अवस्ताविक गोष्टींबद्दल बोलतात आणि माझ्या सारख्या सामान्य माणसाला संभ्रमावस्थेत टाकतात… सत्य समजण्यासाठी मी विज्ञानाबरोबर अध्यात्माचा सुद्धा अभ्यास करतो.. तरीही मला काय माहीत नाहीये .. तुम्हाला खूप माहीत आहे.. कस काय एवढं?



© २०२४, यो. ह. चव्हाण

This site is not a part of the Facebook™ website or Facebook™ Inc. Additionally, This site is NOT endorsed by Facebook™ in any way. FACEBOOK™ is a trademark of FACEBOOK™, Inc. As stipulated by law, we can not and do not make any guarantees about your ability to get results or earn any money with my ideas, information, tools or strategies. I just want to help you by giving great content, direction and strategies that worked well for me and my students and that I believe can help you move forward. All of my terms, privacy policies and disclaimers for this program and website can be accessed via the links. I feel transparency is important and I hold ourselves (you & me) to a high standard of integrity. Thanks for stopping by. I hope this training and content brings you a lot of value & results.